Loading...

शहीद जवान स्व.नागनाथ अभंगराव लोभे यांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न..

शहीद जवान स्व.नागनाथ अभंगराव लोभे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न..
आपल्या निलंगा तालुक्यातील उमरगा गावातील या वीरास गेल्या वर्षी २० डिसेंबर रोजी वीरमरण आले. त्यांच्या शौर्याची व देशप्रेमाची कहाणी येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. याच भावनेने त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी भव्य स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई साळुंके, प्रदेश काँग्रेस सचिव श्री.अभयजी साळुंके, निलंगा पंचायत समितीचे माजी सभापती श्री.अजितजी माने, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री.अविनाशजी रेशमे, डॉ.श्री.लालासाहेब देशमुख, माजी समाज कल्याण सभापती श्री.संजयजी दोरवे, औसा भाजप तालुकाध्यक्ष श्री.सुभाषजी जाधव, जिल्हा प्रभारी श्री.संतोषजी मुथा, जिल्हा परिषद सदस्य श्री.धोंडीरामजी बिराजदार, श्री.विलासजी लोभे, तहसीलदार श्री.गणेशजी जाधव, सरपंच श्री.अमोलजी बिराजदार, श्री.लालाजी पटेल, श्री.आत्मारामजी लोभे, वीर लोभे यांचे वडील पिता श्री.अभंगराव लोभे, त्यांच्या पत्नी, श्री.दशरथ नाना लोभे ग्रामस्थांची उपस्थिती होती.