शिरूर अनंतपाळ येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण

वाढदिवस म्हणजे आनंद साजरा करण्याचा एक क्षण… आपल्या आनंदात इतरांनाही सामावून घेतले तर आनंद द्विगुणित होतो. तसेच आपल्या आनंदाचा क्षण इतरांच्या कामी येत असेल तर यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही…

ॲड.संभाजीराव पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त शिरूर अनंतपाळ येथे रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. ही रुग्णवाहिका गरजूंसाठी खुली केली आहे. याप्रसंगी खा.श्री.सुधाकरजी शृंगारे, जि.प.उपाध्यक्षा सौ.भारतबाई सोळुंखे, सभापती श्री.गोविंदजी चिलकुडे, पंचायत समिती सभापती श्री.नरेशजी चरमले, भाजप तालुकाध्यक्ष श्री.मंगेशजी पाटील, श्री.सचिनजी हुडे तसेच शिरूर अनंतपाळचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.