शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली

शिरूर अनंतपाळ येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली. त्यांना येणाऱ्या अडचणी आणि उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. तसेच ५० कोव्हीड बेड वाढवावे आणि त्यातही ३० ऑक्सिजन बेड असावे अशी सूचना केली. रुग्णालयासाठी उपयुक्त औषधी आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हा दौरा पूर्ण करून साकोळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन त्याची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.
या आढावा दौऱ्यामध्ये उपविभागीय अधिकारी श्री.विकासजी माने, सिव्हिल सर्जन डॉ.सी.एस.देशमुख जी, तहसीलदार श्री.अतुलजी जटाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पवार जी, वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी देवंगरे जी, नगर परिषद सी.ई.ओ. श्री. सचिनजी भुजबळ, बी.डी.ओ. श्री.नंदकिशोरजी शेरखाने, कृषी सभापती श्री.गोविंदजी चिलकुरे, जिल्हा परिषद सदस्य श्री. रामचंद्रजी तिरके, तालुका अध्यक्ष श्री.मंगेशजी पाटील, सरचिटणीस श्री.माधवजी बिरादार, श्री. दगडूजी साळुंखे आदी मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.