शिवराय असे शक्तिदाता...
विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखिल विश्वाला प्रेरणा देणारी आद्यशक्ती. अनेक बलाढ्य परकीय शक्तींना टक्कर देत त्यांनी सार्वभौम राज्याची स्थापना करून आदर्श राज्यव्यवस्थेचे उदाहरण निर्माण करून दिले. त्यामुळे महाराजांचे चरित्र हा एक राष्ट्रग्रंथ आहे. महाराजांचे आचार-विचार हे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी निलंगा मतदारसंघात दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून विश्वविक्रमी शिवजयंती साजरी करण्यात येते.

पर्यावरणाचा संदेश देणारी हरित शिवप्रतिमा


छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे क्राॅप आर्ट तब्बल ८१,३९३ स्क्वेअर.फूट इतक्या भव्यदिव्य क्षेत्रफळात साकारले


११,००० चौ.फूट उंचीचे छ. शिवरायांचे तैलचित्र


५०,००० किलो रांगोळीचा उपयोग करून काढण्यात आली, जगातील सर्वात मोठी रांगोळी.