पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक

संपर्क आणि संवाद हेच विकासाचे माध्यम आहे, प्रत्येक कार्यकर्त्याने हे लक्षात घेऊन लोकांच्या संपर्कात राहिले आणि त्यांच्याशी संवाद साधला तर सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून विकास घडण्यासाठी वेग प्राप्त होत असतो. भारतीय जनता पार्टीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात हे घडले म्हणून विकासाचा वेग वाढला. आता फक्त याचे परिणाम आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.

औसा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या लामजना येथील ऍड.अभय पवार यांच्या निवासस्थानी स्नेह मेळाव्यानिमित पदाधिकारी व कार्यकर्ता बंधूंची बैठक आज घेण्यात आली. औसा मतदार संघातून स्थानिक व सक्षम असणाऱ्या भाजपच्या निष्ठावंत भूमीपुत्राला उमेदवारी द्यावी ही कार्यकर्त्यांची भावना असून, यानुसार पक्षश्रेष्ठी देखील याची दखल घेऊन स्थानिक भूमीपुत्राला उमेदवारी देतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी जि.प.अध्यक्ष श्री. मिलिंद लातुरे, श्री. अरविंद पाटील निलंगेकर, कृषि सभापती श्री. बजरंग जाधव, औसा माजी नगराध्यक्ष श्री. किरण उटगे, श्री. संजय दोरवे, श्री. मधुकर माकणिकर, श्री. नरेंद्र काळे, जि.प. सदस्य श्री. महेश पाटील आदी उपस्थित होते.