“मनमिळावू, मितभाषी, कर्तव्यदक्ष आमदार व लातूरचे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्वांच्याच मनात त्यांनी एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. संभाजीभैय्या यांच्या दूरदृष्टीमुळे माझ्यासह सर्वांनाच खात्री झाली आहे, की लातूरचे भवितव्य हे उज्ज्वल आणि दैदीप्यमान असणार आहे. लातूर जिल्ह्याला अग्रेसर करण्यासाठी जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान, आरोग्य शिबिर आणि अशा इतरही योजनांच्या माध्यमातून शहरी भागासह ग्रामीण जनजीवन सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.”