“संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरचे पालकमंत्री म्हणून अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचं काम त्यांनी केलंय. पालकमंत्री या नात्याने लातूरच्या औद्योगिक विकासामध्ये भर पडावी यासाठी लातूरमध्ये रेल्वे कोच निर्माण करण्याचा कारखाना आणला. यामुळे लातूरच्या औद्योगिक विकासाला जी खीळ बसली होती, ती भरून निघणार आहे.”