“लातूरचे पालकमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांचं लातूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भिन्न भिन्न क्षेत्रांत मोलाचं योगदान आहे. अमाप परिश्रम करून एक सतर्क आणि दूरदृष्टीचा राजकीय नेता म्हणून त्यांनी स्वतःचं स्थान बळकट केलेलं आहे. जलयुक्त शिवार, इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान, मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना ही बोलकी कामं समाजाने अनुभवलेली आहेत. परंतु जगाला जास्त माहीत नसलेल्या, लातूर जिल्ह्यातील त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल मी अधिक सांगू शकतो.”