“सन २०१४ पर्यंत लातूर जिल्ह्यात कॉँग्रेसचा प्रभाव होता. मात्र आज लातूर जिल्हा शत-प्रतिशत भाजपमय बनला आहे. यात पालकमंत्री श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. आज आपण पाहिले, तर लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद एवढेच नव्हे, तर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकतोय. असा शत-प्रतिशत भाजपची सत्ता असलेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”