” संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूरला पाणीदार करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी त्यांनी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानांतर्गत पाण्यासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे सामाजिक क्षेत्रामध्ये एकाच हेतूने काम करत असताना पालकमंत्री म्हणून त्यांची भरपूर मदत झाली. यांनी सुरुवातीपासून लातूर जिल्ह्यातील समस्यांसाठी शाश्वत पर्यायाची अंमलबजावणी करण्यावर भर दिला. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या कामांची पोहोच पावती म्हणून याही वेळी जनता त्यांच्या पाठीशी नक्की उभी राहील याची संपूर्ण खात्री आहे.”