” जिल्हा परिषदेच्या जलसिंचन, रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण आणि आरोग्य विभागातील कामांसाठी आणि एका अर्थाने जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे लातूरमधील सामान्य जनतेला असलेल्या सर्व समस्या दूर करणारा पालकमंत्री लाभला आहे. ग्रामीण भागाला प्राथमिकता देत असताना प्राधान्याने शिक्षण आणि आरोग्य या विषयांत जास्त काम झाले आहे. लातूरमध्ये मा. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जी कामं झाली, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. “