“पालकमंत्री नामदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मागील पाच वर्षांमध्ये जिल्ह्यात काम करत असताना विकासाच्या अनेक योजना या भागामध्ये राबवल्या. त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधीदेखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मा. पालकमंत्र्यांनी अटल महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आपल्या भागातील गोरगरीब कुटुंबांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या सोडवून खऱ्या अर्थाने आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.”