“पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यामध्ये कौशल्य विकास अभियान खूप चांगल्या स्तरावर राबवण्यात आले आहे. लातूर विज्ञान केंद्रासाठी जी जागा उपलब्ध करून दिली आहे, त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदन! तसेच निलंग्यामध्ये दिव्यांगांसाठी जे आयटीआय विद्यालय सुरू केले जात आहे, तोदेखील अत्यंत चांगला उपक्रम आहे. लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे गिरवता यावेत, याकरिता सुरू करण्यात आलेले हे काही स्तुत्य उपक्रम आहेत.”