“मा. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने लातूर जिल्ह्याच्या पालकाची भूमिका निभावली आहे. जिल्ह्यासह संपूर्ण लातूर शहराच्या समस्या समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मागील पाच वर्षांत काम केले आहे. शहरामध्ये लोकांची मागणी असतानादेखील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. संभाजीभैय्यांनी खूप मेहनत घेऊन आम्हांला मार्गदर्शन केले. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामे पूर्ण करून घेतली.”