“पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, तसंच जो प्रयत्न करतो त्याला यशाची वाट सापडते. त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व ऊर्जा असावी लागते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. संभाजीराव पाटील-निलंगेकर! त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तसेच अनुकूल परिस्थितीचा अत्यंत चांगला उपयोग करून घेत, गेल्या पाच वर्षांत अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. त्यांनी लातूरला रेल्वे बोगीचा कारखाना आणून बेरोजगारी निवारणाचे प्रयत्न केले.”