Loading...

“उजाड देवणी तहसील परिसरात फुलली वनराई !”

“उजाड देवणी तहसील परिसरात फुलली वनराई !”
देवणी तहसील कार्यालय माळरानावर वसलेले असल्याने तिथे एक प्रकारची उदासीनता होती. स्थानिक नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात जायचे त्यावेळी ते देखील कार्यालय परिसराच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त करत.
हे चित्र पालटण्याची गरज होती. या कार्यासाठी कोणाचीही वाट न बघता सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनातील दरमहा ११,५०० रु. जमा करून कार्यालय परिसरात ५,००० रोपांची लागवड केली.
माजी खासदार श्रीमती रुपाताई (अक्का) निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत देखील येथे वृक्षारोपण करण्यात आले होते. रोपांच्या पाण्याच्या सुविधेसाठी येथे एक शेततळे, बोअर घेण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांमुळे उजाड असलेल्या या वास्तूमध्ये आता वनराई फुलली असून पक्ष्यांचा किलबिलाटही ऐकू येतो..
कार्यास पोषक वातावरण असल्यास कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होऊन कामाची गुणवत्ता, गती देखील वाढते. अनेक सरकारी कार्यालये या उपक्रमातून प्रेरणा घेतील, हा विश्वास आहे.
देवणी तहसीलचे तहसीलदार श्री.सुरेशजी घोळवे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..