Development Boost

विकासकामांना गती

निलंगा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ संभाजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. Devendra Fadnavis साहेब यांचे समस्त निलंगेकर जनतेकडून मन:पूर्वक आभार!

भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामजिक विकास योजनेअंतर्गत राज्य सरकारने ग्रामीण भागातील पायाभूत, सांस्कृतिक तसेच विविध सोयी-सुविधांच्या विकासाकरिता हा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीच्या माध्यमातून निलंगा, देवणी आणि शिरूरअनंतपाळ तालुक्यातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पथदिवे, समाज मंदिरे, बुद्धविहार, स्मशानभूमी आणि सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत.