व्यक्तिमत्व

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर लातूर जिल्हा तसा अग्रेसर राहिलेला आहे. अनेक नेते या जिल्ह्याने दिले. त्यात सर्वांत तरुण नेते म्हणून संभाजी पाटील निलंगेकर हे राज्याला परिचित आहेत. राजकीय घराण्यातील वारसा असला, तरी संभाजी पाटील निलंगेकर यांनी गेल्या काही वर्षांत स्वकर्तृत्वावर आपले आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व राज्याला दाखवून दिले आहे. कमर्शिअल पायलटपासून त्यांचा सुरू झालेला हा प्रवास आज मराठवाड्याच्या विकासाचा विशेषतः लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या विकासाच्या पायलटपर्यंत येऊन पोहोचला आहे. मराठवाड्याचे तरुण, सर्वमान्य नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
vyaktimatva

राजकीय प्रवेश

“राजकारण हे राष्ट्रसेवेसाठीचे सगळ्यात मोठे माध्यम आहे, त्यामुळे याचा उपयोग जनसेवेसाठी केला पाहिजे”, या भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयीजींच्या शिकवणुकीने प्रेरित होऊन राजकीय प्रवास सुरू केला. २००४ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा आई श्रीमती रुपाताई पाटील निलंगेकर (अक्का) यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आणले. विजयी होऊन त्यांनी लातूर जिल्ह्यात इतिहास घडवला. त्याच वेळेस संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. विजयी होऊन त्यांनी देखील एक इतिहास घडवला. त्या वेळेस विधिमंडळातील ते सर्वांत तरुण आमदार होते…

व्यक्तिमत्व

तरुणाईला भाजपकडे आणले…

भारतीय जनता पक्षात जिल्हा पातळीवर काम केल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांची काम करण्याची शैली पाहून पक्षाने त्यांना बढती दिली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली. २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेत राज्यभर प्रवास केला, प्रत्येक जिल्हा पिंजून काढला. आपल्या कार्यशैलीतून त्यांनी राज्यातील तरुण वर्गाला पक्षाकडे वळवण्यात मोठा वाटा उचलला.

MLA

प्रदेशाध्यक्ष ते मंत्री

 राज्यात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर पुन्हा विजयी झाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेले काम पक्षश्रेष्ठींनी पाहिले होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी त्यांना मिळाली. नवीन आमदाराला पहिल्यांदा राज्यमंत्री केले जाते, पण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या कार्याची शैली पाहून त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले. एक नव्हे दोन नव्हे तर तीन-चार खात्यांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब यांचे आवडते असलेले कौशल्य विकास खाते हे राज्यात संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडेच होते. कामगार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, भूकंप पुनर्सवन आणि माजी सैनिक कल्याण खात्याची जबाबदारीही त्यांच्यावरच होती.

व्यक्तिमत्व

मनमिळाऊ नेतृत्व

कॅबिनेटमंत्री किंवा मोठे राजकीय घराणे असतानासुद्धा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या व्यक्तिमत्त्वात ते कुठे दिसून येत नाही. साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणी हा गुण त्यांच्याकडे आहे. मतदारसंघातच नव्हे, तर राज्यात कोठेही गेले तरी ते लोकांत मिसळतात. त्यांच्या जवळ जाऊन जमिनीवर बसून आपल्यातल्याच माणसासारखे गप्पा मारतात. त्यांची ही शैली लोकांना भावणारी आहे. आपलेसे वाटणारी आहे.

व्यक्तिमत्व

कमर्शिअल पायलट ते विकासाचा पायलट

संभाजी पाटील निलंगेकर यांनी कमर्शिअल पायलट म्हणून लौकिक शिक्षण पूर्ण केले आहे. पण ते राजकारणात आले. पण पायलटच्या शिक्षणातील शिकवण ते विसरले नाहीत. राजकारणात लातूर आणि उस्मानाबादच्या सर्वांगीण विकासाचा पायलट म्हणून त्यांनी भरारी घेतली. दोन्ही जिल्ह्यांसाठी ते एक नवी उमेद असणारे नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. मराठवाड्याचे तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केवळ लातूर जिल्ह्याचाच नव्हे, तर मराठवाड्याचा विकास कसा होईल याचा विचार करणारा तरुण नेता म्हणून आज ते समोर येत आहेत.

व्यक्तिमत्व

वॉटरग्रीडमुळे होईल लातूर, उस्मानाबादचा कायापालट

मराठवाडा गेल्या काही वर्षांत दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जात आहे. मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉटरग्रीड ही महत्त्वकांक्षी योजना हाती घेतली. या योजनेत पहिल्या टप्प्यात औरंगाबाद व जालना हे दोनच जिल्हे होते. पण संभाजी पाटील निलंगेकर यांनी मराठवाड्यात दुष्काळाचा सर्वाधिक फटका लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना बसतो आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यात लातूर व उस्मानाबादचा समावेश असायलाच हवा, हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत निदर्शानास आणून दिले. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांच्या वॉटरग्रीड प्रस्तावाला मंजुरी दिली. या योजनेसाठी लातूर जिल्ह्याकरिता १ हजार ७१३ कोटी, तर उस्मानाबादकरिता १ हजार ४०९ कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे दोन्ही जिल्ह्यांचा कायापालट होणार आहे आणि याचे सर्व श्रेय संभाजी पाटील निलंगेकर यांनाच जाते.

व्यक्तिमत्व

महाराष्ट्रातील पहिला रेल्वे बोगी कारखाना

मराठवाड्याचा विचार करून मा. संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून अत्याधुनिक रेल्वे बोगीचा कारखाना मंजूर करून घेतला. देशातील रेल्वे बोगी तयार करणारा हा चौथा कारखाना आहे. मराठवाड्यात केंद्र शासनाचा सर्वांत मोठा व पहिला कारखाना आहे. या कारखान्यामुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होण्यास मदत होणार आहे. या कारखान्यात मेट्रोच्या वातानुकूलित बोगीही तयार केल्या जाणार आहेत. हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे.

व्यक्तिमत्व

औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार

मा. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून साकारत असलेला ‘मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना, लातूर’ हा मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. रेल्वे बोगीसह मेट्रोच्या वातानुकूलित बोगी येथे तयार होणार आहेत. देशासह परदेशांतील या बोगी जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात वर्षाला २५० बोगी तयार करण्यात येणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात ४०० बोगी तयार करण्यात येणार आहेत. या कारखान्याला लागणाऱ्या ॲक्सेसरीच्या इंडस्ट्रीज येथे उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे लातूरच नव्हे, तर मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्राला चालना मिळणार आहे.

व्यक्तिमत्व

४५,००० जणांना रोजगार

लातूरसह मराठवाड्याचा कायापालट करणारा हा कारखाना आहे. रोजगारासाठी त्रस्त असलेल्या तरुणांसाठी हा कारखाना नवा आशेचा किरण ठरणार आहे. या कारखान्यात जास्तीत जास्त नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळाव्यात, याकरिता मा. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या कारखान्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या असे ४५ हजार जणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहे.