दृष्टी अभियान
ग्रामीण भागातील नेत्र आरोग्याची एक व्यापक चळवळ बनलेल्या ‘दृष्टी’ अभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांच्या अभूतपूर्व यशानंतर या लोकप्रिय अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ स्वामी विवेकानंदांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्वामीजींच्या जयंतीदिनी १२ जानेवारी २०२३ पासून सुरु झालेला आहे.
आर्थिक अडचणी तसेच आरोग्या विषयी अज्ञान असल्याने ग्रामीण भागातील कित्येक जनतेला डोळ्यांच्या समस्या भेडसावत असतात. अशा प्रत्येक गरजू व्यक्तीला योग्य उपचार प्रदान करून स्वच्छ नजर बहाल करणाऱ्या दृष्टी अभियानाला नव्या वर्षात जोमाने सुरवात झाली आहे.
पहिल्या टप्प्याचे यश:
९० दिवसांचे अभियान
४० गावांमध्ये शिबिरांचे आयोजन
१० हजार ६०५ नागरिकांची नेत्रतपासणी
३ हजार ३९९ मोफत चष्मेवाटप
७२० नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
अभियानाचे वैशिष्ट्ये:
– सर्व समस्यांवर मोफत उपचार व मार्गदर्शन
– गावपातळीवर शिबिरांचे आयोजन
– दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना शिबिरापर्यंत नेण्याची मोफत सोय