समृद्ध शेतकरी अभियान

समृद्ध शेतकरी
समृद्ध शेतकरी

‘मातीतलं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची जागतिकस्तरावर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सोयाबीनचे सर्वाधिक उत्पन्न घेतले जाते. देशातील एकूण उत्पादनापैकी ३० ते ३५ टक्के उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रात होते, तर लातूर जिल्ह्यात ८० टक्के पेरा हा एकट्या सोयाबीन पिकाचा केला जातो. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या पेरणीविषयी योग्य माहिती मिळाल्यास, तसेच पिकाची योग्य काळजी घेतल्यास. उत्पादनात दुप्पट वाढ शक्य आहे. उगवण क्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, वाणाची निवड योग्य पेरणीपद्धत, बियाण्यांची मात्रा आणि रायानिक खतांचा योग्य वापर केल्यास. मध्यम ते भारी जमिनीत हेक्टरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळू शकते. याच उद्देशाने लातूर मधील सोयाबीन पिक उत्पादक शेतकरी बांधवांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्यासाठी मा. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून ‘समृद्ध शेतकरी अभियान’ हा अभिनव व कल्पक उपक्रम निलंगा मतदारसंघात राबविण्यात आला. दिनांक २१ मे ते ३ जून या कालवधीत निलंगा, देवणी आणि शिरूर-अनंतपाळ या तीन तालुक्यातीन जवळपास १०० हून अधिक गावांमध्ये मोफत शेतकरी मार्गदर्शन शिबिरे व कार्यशाळा राबविण्यात आल्या. कृषी अधिकारी तसेच कृषीतज्ञांकडून शास्त्रशुद्ध माहिती देऊन सोयाबीन पिकाच्या लागवडीविषयी परिपूर्ण माहिती यावेळी देण्यात आली. मतदारसंघातील जवळपास २५०० हजाराहून अधिक शेतकरी बांधवांनी या अभियानाचा लाभ घेतला.   

सोयाबीन पिकांची उत्पादकता वाढविण्याची यशसूत्री

१. उगवण क्षमता तपासणी

सोयाबीन बियाणांच्या उगवणीचे प्रमाण हे ७० टक्के असून घरगुती बियाणांचे प्रमाण हे क्वचितच ६० टक्के असते. त्यामुळे बियाणांची पेरणी करण्यापूर्वी त्यांची उगवणक्षमता तपासणी गरजेचे आहे.

उगवणक्षमता कशी तपासावी ?

अ) ओल्या गोण पाटावर १०० दाणे न निवडता सरसकट रुजण्यासाठी टाकावेत.

आ) न्यूजपेपर/टिश्यु पेपरवर १०० दाणे न निवडता सरसकट रुजण्यासाठी टाकावेत.

इ) सावलीमध्ये जमिनीत ३ ते ५ सेंमी खोलीवर १०० दाणे न निवडता रुजविण्यास ठेवावे.

२. बीजप्रक्रिया

अधिक उत्पादनासाठी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

अ) रासायनिक बीजप्रक्रिया :  पेरणीपूर्वी दोन महिने अगोदर किंवा पेरणीच्या एक दिवस आधी रासायनिक प्रक्रिया करावी. यासाठी कार्बोक्झीन ३७.५ टक्के + थायरम ३ ग्रॅम/प्रती किलो बियाण्यास लावावे.

 आ) जैविक बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी दोन तास अगोदर बियाणे सावलीत सुकवून २५ ग्रॅम रायझोबीयम किंवा ६ मिली पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा ६ मिली?किलो बियाण्यास लावावे.

३. वाणाची निवड 

शक्यतो दहा वर्षाच्या आतील वाणाची निवड करावी.

४. पेरणी

अ) सलग दोन ते तीन दिवसात ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यास अथवा सहा इंच जमीन ओली झाल्यानंतरच पेरणी करावी.

आ) शक्यो बी.बी.एफ. यंत्राद्वारे पेरणी करावी.

इ) बी.बी.एफ.यंत्र उपलब्ध नसेल तर साध्या पेरणी यंत्राचे एक नाळ बंद करून पेरणी करावी. तसेच पेरणी झाल्यानंतर साध्या बैल चालीत नांगराने सरी ओढून घ्यावी. त्यामुळे बी.बी.एफ पेरणी सारखा परिणाम मिळेल.

Loading...
इंद्रप्रस्थ जलभूमी
harit hatur
हरित लातूर
Harit Shivjayanti
शिवराय असे शक्तिदाता.
anandi
प्रोजेक्ट आनंदी
Drushti Abhiyan
दृष्टी अभियान