shibir

युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन

कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या वतीने निलंगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (I.T.I.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उद्घाटन केले.

विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे. तसेच यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्त्व देऊन वेळेचे पालन करावे. तसेच आई वडिलांचा सन्मान करावा. स्वतःची इच्छाशक्ती सतत जागृत ठेवून स्वाभिमान उंचावेल अशा पद्धतीने काम करावे.

कोरोना काळानंतर व्यवसाय व करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असून या संधीचे सोने कसे करता येईल यासाठी विद्यार्थ्यांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःचे काम स्वतः करण्याची वृत्ती अंगी जोपासत असताना सहनशीलता ही आपल्या मध्ये असावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

लवकर निलंगा येथे मोठ्या प्रमाणावर करिअर शिबिर आयोजित करण्यात येणार असून यासाठी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी या शिबिरांमधून योग्य ती माहिती घेऊन जावी, तसेच वाईट गोष्टींपासून कायम दूर राहावे, असा सल्ला ही यावेळी दिला.

यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेबजी शिंगाडे, आयएमसी आयटीआय चेअरमन एन.आर. बुड्डेजी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक बजाजजी डी.आर., डॉ. गजेंद्रजी तरंगे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कुमारीजी रणभीडकर, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.बी. वाघमारे जी, लातूर कौशल्य व रोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.एस. मरे जी, गटनिर्देशक ए.एस. जाधव जी यांच्यासह खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडूजी सोळुंके, जिल्हाउपाध्यक्ष शेषेरावजी मंमाळे आदींसह युवक-युवती मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.